नाशिक येथे भूमी अभिलेख कार्यालयातील अधीक्षकांना ५० सहस्रांची लाच घेतांना अटक !

भूमी मोजणीमध्‍ये क्षेत्र कायम करण्‍यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच मागितली होती; मात्र तडजोडीअंती ५० सहस्र रुपये द्यायचे ठरले होते.

राष्‍ट्रगुरु श्रीसमर्थ रामदासस्‍वामी यांच्‍या पादुकांचे सातारानगरीत उत्‍साहात स्‍वागत !

दासनवमीच्‍या पार्श्‍वभूमीवर राष्‍ट्रगुरु श्रीसमर्थ रामदासस्‍वामी यांच्‍या पादुका दौर्‍यासाठी निघतात. दौरा संपवून या पादुकांचे नुकतेच सातारा नगरीत आगमन झाले. रामदासस्‍वामी संस्‍थान, सज्‍जनगड येथील पादुका शहरातील काळाराम मंदिर येथे, तर श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्‍जनगड येथील पादुका समर्थ सदन येथे मुक्‍कामी होत्‍या.

देवदरी, अंभेरी (जिल्‍हा सातारा) येथे शिव रुद्राभिषेक आणि सहस्र बिल्‍वार्चन सोहळा पार पडला !

कृतिका नक्षत्र आणि सोमवार या निमित्ताने देवदरी, अंभेरी येथील श्री कार्तिकस्‍वामी आश्रमात शिव रुद्राभिषेक आणि सहस्र बिल्‍वार्चन सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला, अशी माहिती मठपती पू. परशुराम महाराज वाघ यांनी दिली.

दिवा येथील क्षेपणभूमी बंद !

ठाणे महानगरपालिकेच्‍या क्षेत्रात प्रतिदिन १ सहस्र ५० टन कचरा निर्माण होतो. त्‍यापैकी १२५ टन कचर्‍यावर विविध प्रकल्‍पांतर्गत शास्‍त्रोक्‍त पद्धतीने प्रक्रिया करून त्‍यापासून खतनिर्मिती केली जाते.

धर्मांध जोडप्‍याकडून हिंदु युवतीवर हातोडी आणि लाकडी काठी यांसह आक्रमण !

अल्‍पसंख्‍य धर्मांध हिंदूंच्‍या असंघटितपणाचा अपलाभ घेत त्‍यांना काडीचीही किंमत देत नाहीत आणि अरेरावी करतात, हेच या घटनेतून सिद्ध होते !

सातारा जिल्‍ह्यातील दुष्‍काळी भागाला कायमस्‍वरूपी पाणी देणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

सातारा, खटाव आणि कोरेगाव तालुक्‍यातील अनेक गावे सिंचनापासून वंचित आहेत. या गावांचा समावेश भविष्‍यातील सिंचन योजनेत किंवा नवीन सिंचन प्रकल्‍पातून पाणी देण्‍यासाठी फेर सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

पंढरपूर येथील माघ वारी अपघातमुक्‍त करण्‍यासाठी प्रयत्न ! – सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक

माघ वारीसाठी यात्रेच्‍या कालावधीत महामार्गावर पोलिसांचा विशेष पहारा ठेवण्‍यात येणार आहे. यात मुख्‍यत्‍वेकरून कोल्‍हापूर-पंढरपूर महामार्गावर पोलीस साहाय्‍यता केंद्रे चालू करण्‍यात आली असून याद्वारे वारकर्‍यांचे प्रबोधन करण्‍यात येईल.

‘स्‍वतःचा प्राण भगवंताच्‍या दारात जावा’, असे वाटून जणू कबूतराने मरणासन्‍न अवस्‍थेत तीर्थक्षेत्राप्रमाणे चैतन्‍य असलेल्‍या रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात येऊन प्राण सोडणे

पुष्‍कळ जणांच्‍या मनात ‘देवाच्‍या दारात प्राण जावा आणि साधनेत पुढची गती मिळावी’, अशी इच्‍छा असते. त्‍याप्रमाणे ‘काही जणांना तीर्थक्षेत्री, तर काही जणांना गुरुसेवेत असतांना मृत्‍यू येतो.

महाराष्‍ट्रातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्‍या उत्तरायण किरणोत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व !

देवीची मूर्ती देवीतत्त्वाने पूर्णपणे भारित होऊन तिचे तत्त्व शक्‍ती, भाव, चैतन्‍य, आनंद आणि शांती या घटकांच्‍या लहरींच्‍या रूपाने वायूमंडलात प्रक्षेपित होऊन संपूर्ण वायूमंडलाची अल्‍पावधीत शुद्धी होते.

गुजरातमधील ‘हिंदु सेने’च्‍या वतीने हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्याचा गौरव !

लव्‍ह जिहाद, भूमी (लँड) जिहाद, धर्मांतर आणि हलाल जिहाद यांसारख्‍या समस्‍यांच्‍या विरोधात गुजरात राज्‍यात सक्रीय असलेल्‍या ‘हिंदु सेने’कडून निःस्‍वार्थीपणे राष्‍ट्र-धर्मकार्य करत असलेल्‍या हिंदु जनजागृती समितीचा सत्‍कार करण्‍यात आला.