विद्यार्थ्‍यांना निकृष्‍ट दर्जाचा शालेय पोषण आहार पुरवठा करणार्‍यांवर कारवाई करा !

भाजपच्‍या वतीने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्‍या आयुक्‍तांना निवेदन

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्‍त सुनील पवार (उजवीकडे) यांना निवेदन देतांना भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते

 

सांगली – २७ जानेवारीला ‘वान्‍लेसवाडी हायस्‍कूल सांगली’ येथील ३४ विद्यार्थ्‍यांना निकृष्‍ट दर्जाच्‍या पोषण आहारामधून विषबाधा झाली. यामुळे विद्यार्थ्‍यांना जुलाब, उलटी आणि अन्‍य त्रास झाले. इतकी गंभीर घटना असतांना ठेकेदारावर कोणतीही कारवाई न करता केवळ भोजनगृह ‘सील’ करण्‍यात आले. तरी संबंधित ठेकेदारास काळ्‍या सूचीत टाकून अन्‍न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत नियमानुसार संबंधित संस्‍थेवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन भाजपच्‍या वतीने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्‍त सुनील पवार यांना देण्‍यात आले. या प्रसंगी भाजपचे सांगली महानगर जिल्‍हाउपाध्‍यक्ष विशाल पवार, वसीम शिकलगार, विकास सोळांकुरे, गजानन साळुंखे, विनायक साळसकर उपस्‍थित होते.