पुणे – राज्य मंडळाशी संलग्न शाळा सोडून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस्.ई.) आणि अन्य मंडळांच्या संलग्न सर्वच शाळांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी घेतला आहे. राज्यातील २ सहस्र ६०० हून अधिक शाळांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. बनावट कागदपत्रे आढळल्यास शाळांवर फौजदारी कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले. शाळांना बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी कार्यरत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शाळा चालू करण्याचे प्रमाणपत्र, संलग्नतेसाठी राज्यशासनाचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि संबंधित मंडळाचे संलग्नता प्रमाणपत्र आदी कागदपत्रे शाळांकडे असायला हवीत. कागदपत्र पडताळणीसाठी सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. शाळांची पडताळणी सखोल होण्याच्या दृष्टीने याचा कालावधी निश्चित केला जाईल.
संपादकीय भूमिका
|