नागपूर विमानतळावर गो एअर विमानाच्या शौचालयातून ४० लाखांचे सोने जप्त !

प्रतीकात्मक छायाचित्र

नागपूर – येथील सीमाशुल्क विभागाच्या ‘एअर इंटेलिजन्स युनिट’ने गोपनीय माहितीच्या आधारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न उधळून लावला. या कारवाईनुसार तस्करी करून आणण्यात येत असलेले जवळपास ७०० ग्रॅम सोने गो एअरच्या मुंबईवरून नागपूर येथे आलेल्या विमानाच्या केबिन शौचालयातून जप्त केले आहे. या सोन्याची किंमत ४० लाख ४९ सहस्र ५०० रुपये आहे. हे विमान फुकेतवरून मुंबई येथे आले होते. त्यानंतर हे विमान मुंबई येथून नागपूर येथे गेले.

संपादकीय भूमिका

विमानतळावरून वारंवार केली जाणारी सोन्याची तस्करी रोखण्यासाठी संबंधितांना कठोर शिक्षा करायला हवी !