मुंबईत होणार ‘मराठी विश्व परिषद’ !

राज्याच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने मुंबईमध्ये ४ ते ६ जानेवारी २०२३ या कालावधीत वरळी येथील नॅशनल स्पोर्ट स्टेडिअम येथे मराठी विश्व परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेत २० देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी २९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

अंगवाडीसेविकांच्या मानधनवाढीचा निर्णय मार्च २०२३ पर्यंत घेणार ! – मंगलप्रभात लोढा, महिला आणि बाल विकासमंत्री

राज्यातील १५ सहस्र अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सुख-दुःख समजून निर्णय घेणारे आहे. त्यामुळे याविषयीचा निर्णय मार्च २०२३ पर्यंत घेण्यात येईल, अशी ग्वाही महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली.

बोगस डॉक्टरांवरील कारवाई बोगस असल्याची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची स्वीकृती !

राज्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी राज्य आणि तालुका स्तर, तसेच नगरपालिका अन् महानगरपालिका स्तर यांवर समित्या कार्यरत आहेत; मात्र या समित्या कार्यक्षमतेने काम करतांना दिसत नाहीत.

महाराष्ट्रात घुसखोरी करणार्‍या हत्तींना बाहेर काढणार ! – वनमंत्री

गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत हत्तींचा त्रास वाढला आहे. केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आसाम आदी राज्यांतून हत्ती महाराष्ट्रात येत आहेत. गोंदियामध्ये हत्तींनी मोठ्या प्रमाणात धानशेतीची हानी केली आहे. शेतीच्या अवजारांसह हत्ती घरांचीही हानी करत आहेत.

… तर पीकहानी भरपाईवरील व्याज अधिकार्‍यांच्या वेतनातून देणार ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

वन्यप्राण्यांकडून होणार्‍या शेतपिकांच्या हानीविषयी शासन नवीन धोरण आखत आहे. पीकहानी झाल्यापासून ३० दिवसांत हानी भरपाई मिळावी, असा शासनाचा विचार आहे.

छत्तीसगड, गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांना महाराष्ट्र वाघांचा पुरवठा करणार !

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यांनी वाघांची मागणी केली आहे. केंद्रशासनाची अनुमतीने या राज्यांमध्ये महाराष्ट्र वाघ पाठवले, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.

कंत्राटी युनानी वैद्यकीय अधिकार्‍यांना शासकीय नोकरीत समाविष्ट करणार ! – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

कंत्राटी पद्धतीने कार्यरत वैद्यकीय अधिकार्‍यांना शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

हिंदु राष्ट्रात भारतीय भाषांचे संवर्धन होईल !

‘स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे झाली, तरी अजूनही ‘इंग्रजी भाषेची गुलामगिरी नष्ट करावी’, असे एकाही शासनकर्त्याला वाटत नाही. भावी हिंदु राष्ट्रात तामसिक इंग्रजी भाषेचे नव्हे, तर सात्त्विक संस्कृत भाषा आणि अन्य भारतीय भाषा यांचे संवर्धन अन् प्रसार केला जाईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले