दैनिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘तेजस्वी विचार’ वाचतांना गुरूंच्या वाणीविषयी जाणवलेली सूत्रे

सर्व साधकांना आनंदाची अनुभूती देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘१९.४.२०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ या सदरांतर्गत भक्तीयोगाचे महत्त्व विशद करणारी चौकट वाचली. त्यात ‘भक्तीयोगातील साधक देवाकडे सर्वकाही मागू शकतात. कर्मयोग, ज्ञानयोग इत्यादी योगांत देवाचा विचार नसतो. असे असले, तरी इतर योगांतील साधकांना गुरु असल्यास ते गुरूंकडे सर्वकाही मागू शकतात’, अशा आशयाचे लिखाण होते. तेव्हा ते वाचतांना परात्पर गुरु डॉक्टरच हे प्रत्यक्ष बोलत असल्याचे मला जाणवले. त्या वेळी ‘गुरुवाणी’विषयी माझ्या मनात पुढील विचार आले आणि अंत:करणात पुष्कळ कृतज्ञता दाटून आली.

१. ‘मी अमृताची कधी चव चाखली नाही; परंतु ‘गुरुवाणी’ (गुरूंचे बोल) हेच अमृत आहे’, असे मला वाटते.

२. ‘गुरुवाणी श्रवण करतांना अमृताचे रसपान करत आहे’, असे मला वाटते.

३. गुरुवाणीतील सूत्रे आचरणात आणतांना मला आनंदाची अनुभूती येते.’

– कु. रजनीगंधा कुर्‍हे, नागेशी, गोवा. (१९.४.२०२२)