पार्वतीची नऊ रूपे

30नवरात्री नवरात्रोत्सव नवरात्री२०२२ देवी दुर्गादेवी दुर्गा देवी #नवरात्री #नवरात्रोत्सव #नवरात्री२०२२ #देवी #दुर्गादेवी Navaratri Navratri Navaratrotsav Navratrotsav Durgadevi Durga Devi Devi #Navaratri #Navratri #Navaratrotsav #Navratrotsav #Durgadevi #Durga #Devi

सध्या चालू असलेल्या नवरात्रीच्या निमित्ताने देवीविषयीची शास्त्रोक्त माहिती…

 

नवदुर्गा

कोणत्याही देवतेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती कळली, तर तिच्याविषयी श्रद्धा वाढायला साहाय्य होते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण व्हायला साहाय्य होते आणि अशी उपासना अधिक फलदायी असते. हाच भाग लक्षात घेऊन नवरात्रीच्या निमित्ताने शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्‍यांसाठी या लेखमालिकेतून देवीविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती येथे देत आहोत. ३० सप्टेंबर या दिवशी आपण ‘नवदुर्गा’ याविषयीची माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

पार्वतीची नऊ रूपे म्हणजे नवधा प्रकृती होय. यांनाच श्री शंकराचार्य ‘नवात्मा प्रकृती’ म्हणतात. नवधा प्रकृती म्हणजे पंचमहाभूते, मन, चित्त, बुद्धी आणि अहं अशी नऊ तत्त्वे.

विविध नावे

श्री दुर्गासप्तशती आणि आगमग्रंथ यांत पुढील नऊ नावे दिली आहेत – ब्रह्मचारिणी, चंडा, स्कंदमाता, कूष्माण्डा, दुर्गा, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदायिनी. स्कंदयामलात आणि अग्नीपुराणात पुढील नावे आहेत – रुद्रचंडा, प्रचंडा, चंडोग्रा, चंडनायिका, चंडा, चंडवती, चंडरूपा, अतीचंडिका आणि उग्रचंडिका. भविष्यपुराणात त्यांची नावे महालक्ष्मी, नंदा, क्षेमकरी, शिवदूती, महारुद्रा, भ्रामरी, चंडमंगला, रेवती आणि हरसिद्धी अशी सांगितली आहेत. यांची आणखीही काही नावे आढळतात, ती अशी – रुद्रांशदुर्गा, वनदुर्गा, अग्निदुर्गा, जयदुर्गा, रिपुमारीदुर्गा, नीलकंठीदुर्गा, क्षेमकरीदुर्गा, विंध्यवासिनीदुर्गा, हरसिद्धीदुर्गा.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शक्तीचे प्रास्ताविक विवेचन’)