नागपूर – येथील ‘चंद्रशेखर आझाद बहुउद्देशीय संस्थे’च्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या वादग्रस्त श्री गणेशमूर्तीला यंदाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे. चंद्रशेखर आझाद बहुउद्देशीय संस्थेची गणेशमूर्ती शहरातील वादग्रस्त श्री गणेशमूर्ती म्हणूनही ओळखली जाते. या संस्थेच्या माध्यमातून देशात चालू असलेल्या वादविवादला गणेशोत्सवात माध्यमातून लोकांना दाखवले जाते. श्री गणेशमूर्ती आणि देखावा असणार्या ठिकाणाला पोलिसांनी टाळे लावले आहे. श्री गणेशचतुर्थीच्या काही दिवसांनी हा वादग्रस्त देखावा लोकांच्या दर्शनासाठी प्रदर्शित करण्यात येतो; मात्र या गणेशोत्सव मंडळावर पोलिसांची नेहमी दृष्टी असते. या वर्षी या मंडळाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखावा केला होता. या कारवाईला विरोध करणारे मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर पुरी आणि काही कार्यकर्ते यांना पोलिसांनी कह्यात घेतले.