मुंबई – पत्राचाळ भूमी गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १९ सप्टेंबरपर्यंत त्यांना आर्थर रोड कारागृहात रहावे लागणार आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ भूमी गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ३१ जुलै या दिवशी संजय राऊत यांना अटक केली होती. या घोटाळ्याच्या प्रकरणी चौकशीसाठी ८ ऑगस्टपर्यंत ते संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत होते. त्यानंतर न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पी.एम्.एल्.ए.) २००२ नुसार राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.