सांगली महापालिका प्रशासनाच्या मूर्तीदान मोहिमेस नगण्य प्रतिसाद !

सहस्रो भाविकांचे कृष्णा नदीत शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती विसर्जन !

सांगली, ५ सप्टेंबर (वार्ता.) – सांगली महापालिका प्रशासनाने मूर्तीदानासाठी मंडप उभारले आहेत. भाविकांनी मात्र शास्त्रानुसार वहात्या पाण्यातच विसर्जन करण्यास प्राधान्य दिल्याने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या मूर्तीदान मोहिमेस नगण्य प्रतिसाद होता. (हिंदु धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यातच विसर्जन करणार्‍या हिंदु भाविकांचे अभिनंदन ! – संपादक)

वर्षभर होणार्‍या प्रदूषणाकडे काणाडोळा करत, तसेच अन्य धर्मियांच्या प्रदूषणाविषयी काहीही कृती न करता काही कथित पर्यावरणवादी संघटनांचे कार्यकर्ते कृष्णा नदीच्या काठावर ‘मूर्तीदान करा’, असे फलक घेऊन उभे राहिले होते.