डांबर अल्प टाकल्याने रस्त्यांची दुरवस्था ! – पी. शिवशंकर, आयुक्त, सोलापूर महापालिका

मक्तेदार करत असलेल्या रस्त्यांच्या कामांवर महापालिकेतील कुणा अधिकार्‍यांचा अंकुश कसा काय नाही ? मक्तेदारांना नोटीस बजावून न थांबता त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !

पावसाने दडी मारल्याने उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडले !

सध्या पावसाळा चालू असूनही ९ ऑगस्टपासून पावसाने ओढ दिली आहे, तसेच उन्हाचा तडाखाही वाढला आहे. त्यामुळे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २५ दिवसांपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जात आहे.

पिंपरी (पुणे) शहरातील विसर्जन घाटांवर वैद्यकीय सेवा पथक सज्ज !

शहरातील प्रमुख १० श्री गणेशमूर्ती विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिका तैनात ठेवली आहे, तसेच या घाटांसह इतर घाटांवरही जीवरक्षक, अग्नीशमनदल, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा पथक नेमण्यात आले आहेत.

गोमंतकियांना जगासमोर मान खाली घालायला लावणार्‍या गोव्यातील हत्या, अमली पदार्थ आणि वेश्याव्यवसाय यांच्या घटना !

गोव्यातून होणार्‍या मानवी तस्करीचे प्रमाण देशात सर्वाधिक !

स्वदेशी वस्तू खरेदी करून देशाला बलवान बनवा ! – (निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

चिनी बनावटीचे साहित्य खरेदी करू नये. स्वदेशी वस्तू खरेदी करून देशाला आणखीन बलवान बनवा, असे मत ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले आहे.

मागील २ वर्षांत सोलापूर विभागातील १०० एस्.टी. गाड्या ‘स्क्रॅप’ !

आगारात प्रवासासाठी योग्य नसणार्‍या गाड्या महामंडळाच्या अनुमतीने स्क्रॅप करण्यात येतात. २ वर्षांत १०० गाड्या स्क्रॅप झाल्या असून ३० गाड्या मालवाहतुकीसाठी वापरात आल्या आहेत.

पुणे शहरात अनंत चतुर्दशीला ‘निर्माल्य संकलन मोहीम’!

खरे तर फुले, पत्री यांसारख्या निर्माल्यामुळे पाणी प्रदूषित होण्याचा प्रश्नच येत नाही. निर्माल्यातील चैतन्य पाण्यात विसर्जित झाल्यामुळे पाण्याद्वारे त्या चैतन्याचा सर्वदूर स्तरावर लाभ होतो. निर्माल्य दान करण्यासाठी आवाहन केले जाते; मात्र नंतर ते कचर्‍यात, डंपरच्या गाड्यांत टाकले जाते. त्यात निर्माल्याचे पावित्र्य कसे रहाणार ?

पुन्हा एकदा बांगलादेशी…!

बांगलादेशींचे संकट अत्यंत भयावह वेगाने वाढत आहे. बांगलादेशालाही ही घुसखोरी, तसेच हिंदूंविरुद्ध जिहाद रोखण्यासाठी त्याला समजेल अशा भाषेत दरडावणे आवश्यक आहे, अन्यथा बांगलादेशप्रमाणे भारतातही हिंदूंचे अस्तित्व अधिक धोक्यात येईल, हे निश्चित !

अमरावती येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ४३५ किलो गांजा पकडला, ४ जणांना अटक !

७४ लाख २० सहस्र रुपयांचा माल जप्त !

महाराष्ट्रातील काही विवाह संस्था हिंदु मुलींच्या धर्मांतरासाठी साहाय्य करतात ! – नितेश राणे, आमदार, भाजप

महाराष्ट्रातील काही विवाह संस्था हिंदु मुलींच्या धर्मांतरासाठी साहाय्य करतात. केवळ २ सहस्र रुपयांमध्ये अवैध विवाह प्रमाणपत्र देण्यात येतात, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.