पिंपरी (पुणे) शहरातील विसर्जन घाटांवर वैद्यकीय सेवा पथक सज्ज !

पिंपरी (पुणे) – शहरातील प्रमुख १० श्री गणेशमूर्ती विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिका तैनात ठेवली आहे, तसेच या घाटांसह इतर घाटांवरही जीवरक्षक, अग्नीशमनदल, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा पथक नेमण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती विसर्जनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.