पावसाने दडी मारल्याने उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडले !

उजनी धरण

सोलापूर – माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, बार्शी, मोहोळ या तालुक्यांमध्ये पावसाळा चालू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी लावलेली पिके उन्हाच्या तडाख्याने करपण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर शेतीसाठी कॅनॉल, बोगदा, सीना-माढा आणि दहिगाव उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात आले आहे.

सध्या पावसाळा चालू असूनही ९ ऑगस्टपासून पावसाने ओढ दिली आहे, तसेच उन्हाचा तडाखाही वाढला आहे. त्यामुळे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २५ दिवसांपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जात आहे.