नवीन ३०० गाड्यांची विभागाला आवश्यकता
सोलापूर – मागील २ वर्षांत सोलापूर आगारातील १०० एस्.टी. गाड्या स्क्रॅप (जुन्या झाल्याने मोडीत काढणे) झाल्या असून त्याबदल्यात नवीन गाड्या आलेल्या नाहीत. प्रवाशांच्या संख्येनुसार सोलापूर विभागाला ३०० नवीन गाड्यांची आवश्यकता असून एस्.टी. महामंडळाकडे तशी मागणी केली आहे, असे विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी सांगितले.
आगारात प्रवासासाठी योग्य नसणार्या गाड्या महामंडळाच्या अनुमतीने स्क्रॅप करण्यात येतात. २ वर्षांत १०० गाड्या स्क्रॅप झाल्या असून ३० गाड्या मालवाहतुकीसाठी वापरात आल्या आहेत. यापूर्वी सोलापूर आगारामध्ये ७८० गाड्या होत्या. त्यातील केवळ ६५० गाड्यांचा वापर प्रवासासाठी होत आहे. त्यामुळे नवीन गाड्या उपलब्ध होईपर्यंत आहे त्या गाड्यांमध्ये नियोजन करतांना सोलापूर विभागाला अडचणी येत आहेत.