
मुंबई – महाराष्ट्रातील काही विवाह संस्था हिंदु मुलींच्या धर्मांतरासाठी साहाय्य करतात. केवळ २ सहस्र रुपयांमध्ये अवैध विवाह प्रमाणपत्र देण्यात येतात, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नगर येथे एका अल्पवयीन हिंदु मुलीचे बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या घटनेनंतर त्यांनी वरील आरोप केला आहे.
या वेळी ते म्हणाले, ‘‘हिंदु मुलींच्या धर्मांतराचे सूत्र महत्त्वाचे आहे. अनेक मुलींना या जाळ्यात ओढले जात आहे. अशा विवाह संस्थांवर कारवाई करून संबंधित आरोपींना अटक केली पाहिजे.’’
राणे यांनी विधानसभेतही वरील सूत्र उपस्थित केले होते. त्या वेळी नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील घटनेचा संदर्भ दिला होता. ‘‘हिंदूंच्या मुलीचे धर्मांतर करण्यासाठी जातीवरून किंमत ठरते. शीख मुलीसाठी ७ लाख, ब्राह्मण मुलीसाठी ५ लाख, क्षत्रिय मुलीसाठी ४ लाख, गुजराती ब्राह्मण मुलीसाठी ६ लाख, पंजाबी हिंदु मुलीसाठी ६ लाख असे ‘रेट कार्ड’ आहे’’, असा आरोपही त्यांनी त्या वेळी केला होता.
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी
सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले !
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, अध्यक्ष, भाजप, मुंबई
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Amroha Conversion : अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे नाव पालटून रुग्णालय चालवणार्या मुसलमानाकडून हिंदु परिचारिकेचे धर्मांतर