मुंबईत रेल्वे रुळावर दगडांनी भरलेले लोखंडी पिंप ठेवून घातपाताचा प्रयत्न !
सँडहर्स्ट रोड ते भायखळा स्थानक यांच्या दरम्यान रेल्वेच्या रुळावर दगडांनी भरलेले लोखंडी पिंप ठेवून समाजकंटकाने घातपात करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र मोटरमनच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपच्या ‘मिशन मुंबई’चा शुभारंभ होणार
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा ५ सप्टेंबर या दिवशी मुंबई दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात ते ‘लालबागचा राजा’ आणि श्री सिद्धिविनायक या प्रमुख गणपतींचे दर्शन घेणार आहेत.
मुंबई येथे १० देशांच्या ‘महावाणिज्यदूतां’नी घेतले मानाच्या श्री गणेशमूर्तींचे दर्शन !
विविध देशांच्या मुंबई स्थित महावाणिज्यदूतांनी शहरातील मानाच्या श्री गणेशमूर्तींचे दर्शन घेतले. गणरायांचे दर्शन आणि भक्तीभावाने भारावलेले वातावरण पाहून ‘अद्भूत अनुभूती’ आल्याची प्रतिक्रिया त्यांनी या वेळी व्यक्त केली.
‘गायत्री धाम’चे मुख्य व्यवस्थापक पंडित मेवालाल यांना सनातनचा ग्रंथ भेट !
निसर्गोपचार, योग, ध्यान, आयुर्वेद अशा सर्व भारतीय चिकित्सा पद्धतींचा अभ्यास असणारे आणि त्यानुसार गेली अनेक वर्षे लोकांवर यशस्वी उपचार करणारे ‘गायत्री धाम’चे मुख्य व्यवस्थापक पंडित मेवालालजी पाटीदार यांची हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी सदिच्छा भेट घेतली.
सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणार्या वस्त्रांचा पुरस्कार करा ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा
श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने जागतिक वारसास्थळांवरील आध्यात्मिक संशोधन ‘ऑनलाईन’ सादर !
अकोला येथील ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात श्रीफळ अर्पण करून धर्मप्रेमींनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ
हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला येत्या घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे २९ सप्टेंबर या दिवशी २० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने समिती आगामी दोन मास ‘हिंदु राष्ट्र संकल्प मास’ साजरे करणार आहे.
श्री गणेशमूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता मूर्तीचे दान करावे ! – तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे धर्मद्रोही आवाहन
घरी मूर्तीच्या विसर्जनासाठी नगर परिषदेकडून अमोनियम बाय कार्बोनेटचे विनामूल्य वाटप
३ फुटांपेक्षा मोठ्या मूर्ती सोलापूर शहरात विसर्जन करता येणार नाहीत ! – पी. शिवशंकर, आयुक्त, महापालिका
शहरातील श्री सिद्धेश्वर तलाव आणि छत्रपती संभाजी तलाव या ठिकाणी कृत्रिम तलाव करून श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याची सोय करण्यात आली आहे; मात्र या ठिकाणी ३ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करता येणार नाही.
(म्हणे) ‘पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास अनुमती नाही !’ – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
कारखान्यांचे सांडपाणी, तसेच अन्य ज्या ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होते त्या सर्वांवर आम्ही कारवाई करत आहोत. नुकतीच प्रदूषण मंडळाने महापालिका प्रशासनास कारवाईची नोटीस दिली आहे, असे या वेळी जिल्हाधिकार्यांनी सांगितले.