मुंबईत रेल्वे रुळावर दगडांनी भरलेले लोखंडी पिंप ठेवून घातपाताचा प्रयत्न !

मोटरमन अशोक शर्मा

मुंबई –  सँडहर्स्ट रोड ते भायखळा स्थानक यांच्या दरम्यान रेल्वेच्या रुळावर दगडांनी भरलेले लोखंडी पिंप ठेवून समाजकंटकाने घातपात करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र मोटरमनच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला. ३ सप्टेंबर या दिवशी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते खोपोली ही लोकल सँडहर्स्ट रोड स्थानकातून पुढे निघाली. काही अंतरावर जाताच मोटरमन अशोक शर्मा यांना रुळावर काहीतरी संशयास्पद वस्तू पडल्याचे दिसले. त्यांनी तातडीने ब्रेक लावून लोकल थांबवली आणि स्वतः त्या वस्तूची पहाणी केली. तेव्हा एका मोठ्या पिंपामध्ये दगड भरून ठेवल्याचे त्यांना आढळले. २० किलो दगड या पिंपात घालून ठेवल्याचे लक्षात आले. घातपात घडवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.