सोलापूर – शहरातील श्री सिद्धेश्वर तलाव आणि छत्रपती संभाजी तलाव या ठिकाणी कृत्रिम तलाव करून श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याची सोय करण्यात आली आहे; मात्र या ठिकाणी ३ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करता येणार नाही. मोठ्या श्री गणेशमूर्ती हिप्परगा येथील दगड खाण येथेच विसर्जन कराव्यात, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
या वेळी पी. शिवशंकर यांनी सांगितले की, शहरामध्ये एकूण १३ ठिकाणी श्री गणेशमूर्ती विसर्जनाची सोय करण्यात येणार आहे. तलावांमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी घातली