केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपच्या ‘मिशन मुंबई’चा शुभारंभ होणार  

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

मुंबई, ३ सप्टेंबर (वार्ता.) – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा ५ सप्टेंबर या दिवशी मुंबई दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात ते ‘लालबागचा राजा’ आणि श्री सिद्धिविनायक या प्रमुख गणपतींचे दर्शन घेणार आहेत. अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप ‘मिशन मुंबई महापालिके’चा शुभारंभ करणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.