कोल्हापूर, ३ सप्टेंबर (वार्ता.) – पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास अनुमती नाही, अशी ठाम भूमिका कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत २ सप्टेंबर या दिवशी स्पष्ट केली होती. या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी म्हणाले होते, ‘‘मुंबई येथे झालेल्या बैठकीत पंचगंगा नदीत विसर्जन करण्यास आडकाठी नाही, असे सांगण्यात आले होते; मात्र आम्ही तात्काळ प्रदूषण नियंत्रण मंडळ, न्यायालय, हरित लवाद यांचे विविध आदेश शासनाकडे पाठवले. वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा आग्रह करू नये, यासाठी कोणताही शास्त्रीय आधार नाही.’’
कारखान्यांचे सांडपाणी, तसेच अन्य ज्या ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होते त्या सर्वांवर आम्ही कारवाई करत आहोत. नुकतीच प्रदूषण मंडळाने महापालिका प्रशासनास कारवाईची नोटीस दिली आहे, असे या वेळी जिल्हाधिकार्यांनी सांगितले. (गेली अनेक वर्षे प्रचंड प्रमाणात कारखान्यांच्या सांडपाण्याद्वारे सातत्याने नदीत प्रदूषण होत असतांना आता एवढ्या उशिरा नोटीस का दिली ? – संपादक)
या संदर्भात मी स्वत: आमदार प्रकाश आवाडे यांच्याशीही बोललो आहे. ‘पंचगंगा नदीतच विसर्जन’, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी घेणे निराशाजनक आहे. यामुळे आपण चार पावले मागे येतो. आपण नेहमी बुद्धीप्रामाण्यवादाचाच आग्रह धरला पाहिजे. इचलकरंजी आणि कोल्हापूर यांसह अनके ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवले असून त्यातच श्री गणेशमूर्ती विसर्जन करावे. (बुद्धीप्रामाण्यावादाचा आग्रह धरणार्या जिल्हाधिकार्यांनी धर्मशास्त्र समजून घेऊन त्याविषयीचे निर्णय घेणे अपेक्षित आहे ! – संपादक)
|