आरोग्य विभागातील १० सहस्र ८२७ जागा रिक्तच !

सहस्रावधींच्या संख्येत पदे रिक्त असणारा आरोग्य विभाग जनतेच्या आरोग्याची काळजी कशी घेणार ?

दहीहंडीचा साहसी खेळात समावेश, शासन आयोजित करणार स्पर्धा !

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा, तसेच वर्ष २०२३ पासून ‘प्रो गोविंदा स्पर्धा’ आयोजित करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत दिली.

तिकीट यंत्राच्या रोलचा तुटवडा असल्यामुळे ४ जणांत मिळून १ तिकीट !

कोरोनाच्या संकटातून सावरल्यानंतर संपामुळे गतप्राण झालेली एस्.टी. आता पूर्वपदावर येऊ लागली आहे; मात्र एस्.टी.च्या समस्या संपता संपेनात, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

२५ ऑगस्टपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरणार ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे २५ ऑगस्टपूर्वी बुजवण्यात येतील. २६ ऑगस्ट या दिवशी कोकणातील आमदारांसह रस्त्याची पहाणी करण्यात येईल.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना वाढीव अनुदान देण्याविषयी २३ ऑगस्टला बैठक घेऊ ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

हा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे. विनाअनुदानित शाळांना २० टक्के वाढीव अनुदान देण्याविषयी लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी मागणी करत आहेत.

प्रदूषणविरोधी कायद्याचा गैरवापर करणार्‍या ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या अधिकार्‍यांवर कारवाई करा ! – जितेंद्र वाडेकर, विश्व हिंदु परिषद

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांवर ध्वनीप्रदूषण केल्याचे २३० खटले प्रविष्ट केले आहेत, मुसलमानांवर केवळ २२ खटले ?

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन राष्ट्रासाठी साधनेच्या स्तरावर प्रयत्न करायला हवेत ! – नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती

आदर्श राष्ट्र आणि समाज घडवण्यासाठी भगवंताच्या कृपेची आवश्यकता आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपले साधनेच्या स्तरावर प्रयत्न हवेत.

‘राष्ट्रीय लोक अदालती’त प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा अग्रेसर !

प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय देशमुख अन् सचिव मंगेश कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली या लोक अदालतीचे आयोजन केले होते.

राज्यातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या शिक्षण सेवक पदाच्या मानधनात वाढ करावी या मागणीनुसार मानधन देण्याविषयी धोरण ठरवण्यात येत आहे.

किडनी प्रत्यारोपणातील अपहाराच्या चौकशीला ४ मासांनंतरही विलंब !

याविषयी एका मासात अंतरिम अहवाल देण्यात येईल. यामध्ये रुग्णालयाचा सहभाग आढळल्यास त्यांची मान्यता रहित करण्यात येईल, तसेच डॉक्टर दोषी आढळल्यास त्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल.