‘राष्ट्रीय लोक अदालती’त प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा अग्रेसर !

पुणे – १३ ऑगस्ट या दिवशी आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय लोक अदालती’मध्ये एकूण २५ सहस्र २१८ प्रकरणे निकाली काढली. त्यांपैकी १४ सहस्र प्रलंबित प्रकरणे ही पुण्यातील होती. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक असल्याने प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय देशमुख अन् सचिव मंगेश कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली या लोक अदालतीचे आयोजन केले होते.