मुंबई, १८ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यातील शिक्षकेतर कर्मचार्यांच्या शिक्षण सेवक पदाच्या मानधनात १५-२० सहस्र रुपयांपर्यंत वाढ करावी, अशा मागणीची याचिका उच्च न्यायालयात शिक्षकेतर कर्मचार्यांनी प्रविष्ट केली आहे. यानुसार शिक्षणसेवक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना मानधन देण्याविषयी धोरण ठरवण्यात येत आहे. राज्यातील शिक्षकेतर कर्मचार्यांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत १८ ऑगस्ट या दिवशी दिली. सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी हा प्रश्न प्रश्नोत्तरात उपस्थित केला होता.