सातारा, १८ ऑगस्ट (वार्ता.) – वर्ष २०१५ ते २०२१ या काळात ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने हिंदूंच्या दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांवर ध्वनीप्रदूषण केले म्हणून २३० खटले प्रविष्ट केले आहेत. मुसलमानांवर केवळ २२ खटले प्रविष्ट केले आहेत. ही माहिती ‘माहिती अधिकारात’ उघड झाली आहे. म्हणजे ९२ टक्के गुन्हे हिंदूंवर आणि केवळ ८ टक्के गुन्हे मुसलमानांवर प्रविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे असे पक्षपातीपणे वागणार्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व संबंधित अधिकार्यांना तात्काळ निलंबित करावे, तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे सातारा शहरमंत्री जितेंद्र वाडेकर यांनी केली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राजवाडा येथील गोलबागेसमोर ‘हिंदु राष्ट्र- जागृती आंदोलन’ आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या आंदोलनाला विश्व हिंदु परिषदेचे सर्वश्री विजय गाढवे, तात्यासाहेब नावलीकर, विकुमार ताथवडेकर, सावरकरभक्त श्री. मोहनराव साठे हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.