हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : हिंदु राष्ट्र-स्थापना

हिंदु राष्ट्र का हवे ?

‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’सारखे राज्य ! हिंदु राष्ट्रात भारताच्या अंतर्गत आणि बाह्य समस्या सुटतील ! लोकशाहीमुळे झालेली अधोगती रोखण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची आवश्यकता सांगणारा आणि धर्माधिष्ठित व्यवस्थेचे महत्त्व विशद करणारा ग्रंथ !


हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा

हिंदु समाजातील संत, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि कार्यकर्ते, विचारवंत आदींनी हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दृष्टीने संतांच्या ब्राह्मतेजाचे (आध्यात्मिक बळाचे) महत्त्व ओळखून संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी करावयाच्या कार्याची दिशा या ग्रंथात विशद केली आहे.


लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध करायच्या प्रत्यक्ष कृती

आजच्या लोकशाहीतील भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आदींचा आपल्या प्रत्येकालाच प्रतिदिन अनुभव येतो. हा अन्याय रोखण्यासाठी आणि हे चित्र पालटून रामराज्यासम आदर्श हिंदु राष्ट्राच्या उभारणीसाठी सर्वांनी संघटित होऊन दुष्प्रवृत्तींविरुद्ध वैधरित्या लढून राष्ट्रकर्तव्य बजावूया !

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३ १५३१७