बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीने जामिनावर सुटताच पीडितेवर पुन्हा केला बलात्कार !

बलात्कारचे चित्रीकरण करून तक्रार मागे घेण्यासाठी धमकी

नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार
तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी युवकांनी हनुमानाचे गुण अंगीकारावे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हनुमान रामभक्तांच्या समोर नम्रपणे हात जोडून उभे रहायचे आणि असुरांच्या समोर त्यांचे महाबली रूप प्रकट व्हायचे. सध्या हनुमानाची उपासना करतांना आपण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांचे गुण अंगिकारले पाहिजेत, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयाकडून ‘लवासा’ प्रकरणी शरद पवार यांच्यासह ५ जणांना नोटीस !

४ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

जातीयतेचे विष पेरणार्‍यांपासून सावध रहा ! – अभिनेते शरद पोंक्षे

मागील पंधरा-वीस वर्षांत राज्यात जातीच्या भिंती बळकट करण्याचे काम काही जणांकडून केले जात आहे, त्यापासून सावध रहा. संघटित होऊन जातीय विष पेरणार्‍यांना उत्तर द्या, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.

संजय राठोड यांना मंत्रीमंडळात स्थान दिल्याने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची टीका !

पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात झालेल्या गंभीर आरोपांमुळे महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना मंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले होते; पण त्यांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान दिल्यामुळे भाजपच्या नेत्या सौ. चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

अमरावती येथे पुराच्या पाण्यात ट्रॅक्टरसह ५ जण वाहून गेले !

ही घटना ८ ऑगस्टच्या सायंकाळी ७ वाजता घडली. यातील २ जण पाण्यातून बाहेर आले असून ३ जण अद्याप सापडलेले नाहीत.

धर्मांतराचे गुन्हेगारीकरण रोखायला हवे ! – भारतीय मानवाधिकार परिषद

नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका महिलेच्या धर्मपरिवर्तनाचा प्रकार हा अवैध असल्याचे पडताळणीतून सिद्ध झाले आहे. महिलेने तक्रार करूनही नोंद घेतली नाही, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.