बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीने जामिनावर सुटताच पीडितेवर पुन्हा केला बलात्कार !

बलात्कारचे चित्रीकरण करून तक्रार मागे घेण्यासाठी धमकी

जबलपूर (मध्यप्रदेश) – येथे बलात्काराच्या प्रकरणात अटक झालेला आरोपी विवेक पटेल याने जामिनावर सुटताच चाकूचा धाक दाखवून पीडितेवर पुन्हा बलात्कार केला. यासह त्याने बलात्कार करतांनाचा व्हिडिओ बनवून त्याआधारे पीडितेला ‘माझ्या विरोधात केलेली तक्रार मागे घेतली नाहीस, तर हा व्हिडिओ प्रसारित करीन’, अशी धमकी दिली.

पटेल याने २ वर्षांपूर्वी पीडितेवर बलात्कार केला होता, त्यानंतर त्याला अटक झाली होती. एका वर्षाच्या कारावासानंतर तो जामिनावर सुटला. बाहेर आल्यानंतर त्याने पीडितेचे घर गाठले आणि तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. ‘विरोध केला, तर ठार मारीन’ अशी धमकी देत त्याने पीडितेवर बलात्कार केला. विवेकसमवेत त्याचा मित्रही आला होता, ज्याने बलात्कार होत असतांना व्हिडिओ बनवला होता.

संपादकीय भूमिका

या घटनेतून लक्षात येते की, बलात्कार्‍यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीच शिक्षा मिळणे किती आवश्यक आहे ! सरकार या दृष्टीने कधी प्रयत्न करणार ?