नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

  • बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार

  • तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

(डावीकडून) नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची व तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपशी युती तोडून मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिल्यानंतर दुसर्‍याच दिवशी राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि इतर मित्रपक्ष यांना समवेत घेऊन महाआघाडीची स्थापना केली. नितीश कुमार यांनी १० ऑगस्ट या दिवशी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या वेळी राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

या महाआघाडीत एकूण ७ पक्ष आहेत. महाआघाडीतील सर्व पक्षांचे एकूण १६४ आमदार असून या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र त्यांनी ९ ऑगस्ट या दिवशी राज्यपालांकडे सोपवले होते. त्यानंतर १० ऑगस्टला राज्यपालांनी त्यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले होते.