उमेश कोल्हे हत्याप्रकरणी एन्.आय.ए.कडून आणखी २ आरोपींना अटक !

मुर्शिद अहमद अब्दुल रशीद (वय ४१ वर्षे) आणि अब्दुल अरबाज अ. सलीम (वय २३ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता ९ झाली आहे.

विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करण्याचा हिंदु संघटनांच्या बैठकीत एकमुखी निर्णय !

नुकतीच शासकीय विश्रामधाम येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची ‘हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे एकत्रीकरण’ आणि ‘विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमण’ या दोन विषयांच्या संदर्भात चर्चा झाली. या बैठकीत विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

लोकमान्य टिळक हे हिंदु महासभेच्या गुरुस्थानी ! – अधिवक्ता गोविंद तिवारी, अ.भा. हिंदु महासभा

अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील गुजराती महाजनवाडा मंगल कार्यालय येथे टिळक भक्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

भंडारा जिल्ह्यातील एका महिलेला फसवून ३ जणांकडून कन्हाळमोह जंगलात बलात्कार

बहिणीशी किरकोळ कारणावरून वाद झाल्याने घरातून बाहेर पडलेल्या एका ३५ वर्षीय महिलेवर भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह जंगलात नेऊन ३ जणांनी बलात्कार केला. तिला निर्वस्त्र आणि बेशुद्धावस्थेत सोडून आरोपींनी पळ काढला.

मीरारोड येथे खंडणीसाठी अपहृत मुलाची हत्या करणार्‍या दोघा धर्मांधांना अटक !

२५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी १३ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करणारे अफझल अन्सारी (वय २२ वर्षे) आणि इम्रान शेख (वय २४ वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

एक राखी सीमेवरील सैनिकांसाठी पाठवून त्यांचे नैतिक बळ वाढवूया ! – ‘श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट’चे आवाहन

२ वर्षे कोरोना महामारीच्या काळातही राख्या पाठवण्यात आल्या. याच प्रकारे यंदाही विविध संकलन केंद्रांवर या राख्या संकलित करून त्या सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत.

नियोजित कार्यक्रम रहित करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देहली येथे गेले !

नियोजित कार्यक्रम रहित करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४ ऑगस्ट या दिवशी तातडीने देहली येथे गेले. राज्यातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराविषयी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी ते घेतील, अशी शक्यता आहे.

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांना ईडीकडून समन्स !

पत्राचाळ प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) शिवसेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी उपस्थित रहाण्याचे समन्स पाठवले आहे. या प्रकरणी वर्षा राऊत यांच्या खात्यावरील व्यवहार उघडकीस आल्यानंतर त्यांना हे समन्स बजावण्यात आले आहे.

‘टीईटी’ परीक्षेमध्ये अपप्रकार केलेल्या ७ सहस्र ८७४ उमेदवारांची सूची घोषित !

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपप्रकार केलेल्या ७ सहस्र ८७४ उमेदवारांची सूची परीक्षा परिषदेने घोषित केली असून संबंधित उमेदवारांची टीईटीची प्रमाणपत्रे रहित करण्यासह त्यांना या पुढील परीक्षा देण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध घातला आहे.

शिवसैनिकांवरील कारवाईच्या प्रकरणी शिवसेना नेत्यांकडून पोलीस महासंचालकांकडे तक्रार

पुणे पोलिसांनी शिवसैनिकांवर केलेल्या कारवाईच्या विरोधात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यासह अन्य सेना नेत्यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची भेट घेऊन या घटनेत लक्ष घालण्याची विनंती केली आहे.