लोकमान्य टिळक हे हिंदु महासभेच्या गुरुस्थानी ! – अधिवक्ता गोविंद तिवारी, अ.भा. हिंदु महासभा

अधिवक्ता गोविंद तिवारी

सातारा, ४ ऑगस्ट (वार्ता.) – देशात स्वातंत्र्यपूर्व काळापासून जहाल आणि मवाळ असे गट कार्यरत होते. लोकमान्य टिळक यांचे विचार हे राष्ट्रहितवादी आणि जहाल होते. राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व जोपासणारे होते. लोकमान्य टिळक यांनी दाखवलेल्या मार्गावरच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आयुष्यभर वाटचाल केली. त्यामुळे लोकमान्य टिळक हे नेहमीच हिंदु महासभेच्या गुरुस्थानी आहेत, असे प्रतिपादन अखिल भारत हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी यांनी केले.

अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील गुजराती महाजनवाडा मंगल कार्यालय येथे टिळक भक्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, टिळकभक्त तसेच शहरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदांिधकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या वेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत लोकमान्य टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु महासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनराज जगताप यांनी केले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे यांनी उपस्थितांना ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर अर्थव्यवस्था कशी उभारण्यात येत आहे, यासाठी कोणकोणती माध्यमे उपयोगात आणली जात आहेत, त्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा विपरीत परिणाम होऊ पहात आहे, याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.

अधिवक्ता कै. गोविंद गांधी कुशल हिंदु संघटक ! – अधिवक्ता गोविंद तिवारी

अधिवक्ता कै. गोविंद गांधी

सातारा, ४ ऑगस्ट (वार्ता.) – ‘अखिल भारत हिंदु महासभे’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता कै. गोविंद गांधी हे अत्यंत प्रेमळ आणि परोपकारी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्यामुळे केवळ हिंदु महासभेच्याच नव्हे, तर सर्वच हिंदुत्वनिष्ठांना दु:ख झाले. ‘कार्याहून माणूस महत्त्वाचा’, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी प्रचंड लोकसंग्रह केला होता. अधिवक्ता कै. गोविंद गांधी हे खर्‍या अर्थाने कुशल हिंदु संघटक होते, असे प्रतिपादन अखिल भारत हिंदु महासेभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी यांनी केले. वरील कार्यक्रमात ते बोलत होते.

त्र्यंबकेश्वर येथील महामंडलेश्वर देव बाबा उपाख्य फरशीवाले बाबा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी हिंदु महासभेचे महाराष्ट्र राज्यातून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच सातारा जिल्हा, तसेच शहर येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.