भाव तैसें फळ । न चले देवापाशी बळ ।। (भाव कसा असावा ?)

‘भाव तैसें फळ । न चले देवापाशी बळ ।।’ या संत तुकाराम महाराज यांच्या ओळींचा अर्थ सांगतांना संभाजीनगर येथील डॉ. विजयकुमार फड यांनी भावाविषयी केलेले विश्लेषण पुढे दिले आहे.

कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही आनंदी रहाणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या नाशिक येथील (कै.) सौ. दीपाली आव्हाड (वय ५५ वर्षे) !

नाशिक येथील सौ. दीपाली दिलीप आव्हाड यांचे २८.१०.२०२१ या दिवशी निधन झाले. आषाढ कृष्ण अष्टमी (२०.७.२०२२) या दिवशी त्यांचे ९ वे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे लोटे, जिल्हा रत्नागिरी येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र चाळके आणि चिपळूण येथील डॉ. (सौ.) साधना जरळी !

श्री. महेंद्र चाळके आणि चिपळूण येथील डॉ. (सौ.) साधना जरळी यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ठ्ये येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या वेळी सनातन संस्थेचे संत पू. रमानंद गौडा यांना आलेल्या अनुभूती

प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी त्यांच्या मार्गदर्शनाची चित्रफीत पहातांना ‘गुरुदेवांना पहातच रहावे’, असे वाटून अतिशय आनंद होणे

निधन वार्ता

येथील सनातनच्या साधिका सुनंदा व्हावळ यांचे पती सुरेश व्हावळ (वय ७४ वर्षे) यांचे १८ जुलै या दिवशी सकाळी ७.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. सनातन परिवार व्हावळ कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

राजस्थानमध्ये भाजपच्या खासदाराला जिहाद्याकडून जिवे मारण्याची धमकी

काँग्रेसच्या राज्यात आता हिंदूंचे नेतेही असुरक्षित आहेत, हे लक्षात घ्या !

नूपुर शर्मा यांच्या अटकेला १० ऑगस्टपर्यंत स्थगिती

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी वृत्तवाहिनीवरील एका चर्चासत्रात महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानकारक विधानावरून त्यांच्या विरोधात देशातील ९ पोलीस ठाण्यांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

केंद्र सरकारने सुटे धान्य, लस्सी आदींवरील जी.एस्.टी. मागे घेतला !

सुट्या डाळी, गहू, राई, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यांवर ५ टक्के जी.एस्.टी. द्यावा लागणार नाही, अशी घोषणा केंद्र सरकारने केली.

जम्मू-काश्मीरमधून ७ आतंकवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक

पोलिसांनी राज्यातील लष्कर-ए-तोयबाच्या ७ आतंकवाद्यांना अटक केली. राजौरी येथून ५, तर जम्मूमधून २ जणांना अटक करण्यात आली.

हिंदु असणे ही शरमेची गोष्ट आहे का ?

भारतात एका हिंदु व्यक्तीला असा प्रश्‍न उपस्थित करावा लागतो, हे हिंदूंना लज्जास्पद !