पुणे शहरात सराफी पेढीतून ५ किलो सोन्याची बिस्किटे चोरीस !

गुन्हेगारांनी मोठे गुन्हे करण्याला पोलिसांचा धाकच उरलेला नसणे कारणीभूत !

७० मीटरहून अधिक उंच इमारतींमध्ये ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ बंधनकारक ! – राज्य सरकार

राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील उंच इमारतींमध्ये अग्नीसुरक्षेच्या दृष्टीने ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ (आग लागल्यानंतर नागरिकांना बाहेर काढण्याचे उद्वाहन) बसवणे बंधनकारक केले आहे.

राज्यातील भिकार्‍यांचे राज्य सरकार पुनर्वसन करणार !

राज्यातील भीक मागणार्‍या व्यक्ती, तसेच बालके यांचा तपशील गोळा करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात येणार आहे.

इंधन समायोजन आकाराच्या नावाखाली थेट वीज आकाराच्या २० टक्के दरवाढ लागू ! – प्रताप होगाडे, वीजतज्ञ

राज्यातील घरगुती, व्यापारी, शेतकरी, औद्योगिक आणि अन्य सर्व २ कोटी ८७ लाख ग्राहकांवर जुलै २०२२ मध्ये मिळालेल्या देयकापासून ५ मासांसाठी ‘इंधन समायोजन आकार’ या नावाखाली थेट वीज आकाराच्या २० टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे.

राज्यातील ५ मोठ्या धरणांतील गाळ काढण्याचा निर्णय !

राज्यातील उजनी, गिरणा, गोसीखुर्द, जायकवाडी आणि मुळा या ५ जुन्या धरणांत साठलेला गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मागवण्यात येणार्‍या निविदा कागदपत्रांचे मानक प्रारूप सिद्ध करण्यासाठी राज्यशासनाने समिती स्थापन केली आहे.

‘आरे’मध्ये वृक्षतोडणीला विरोध करणारे पोलिसांच्या कह्यात !

‘आरे’ परिसरात वृक्ष तोडण्याची कारवाई चालू झाली असून याला विरोध करणार्‍यांना पोलिसांनी नोटिसा बजावून कह्यात घेतले आहे. येथील ‘कारशेड’चे काम चालू करण्यात आल्याची चर्चा या परिसरात आहे. आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमी आणि विविध संघटना यांनी आंदोलन चालू केले आहे.

बी.ए.च्या प्रश्नपत्रिकेतील छत्रपती शिवाजी महाराज आणि मनुस्मृति यांच्याविषीच्या प्रश्नांना अंनिसकडून राज्यघटनाविरोधी ठरवण्याचा प्रयत्न !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या हिंदुत्वाच्या कार्याविषयी कधी अभिमानही व्यक्त न करणार्‍या अंनिसवाल्यांनी त्यांच्याविषयीच्या प्रश्नावर आक्षेप घेणे, हेच हास्पास्पद होय !

शाळा आणि महाविद्यालय यांच्या परिसरात कायदेविषयक फलक लावणार ! – महिला दक्षता समितीच्या बैठकीतील निर्णय

शहर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या महिला सहभागी झाल्या होत्या.

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये राज्यातील ११० नागरिकांचा मृत्यू !

या वर्षी १ जून ते २३ जुलै या पावसाळ्याच्या कालावधीत उद्भवलेल्या पूर, वादळ, भूस्खलन, वीज कोसळणे आदी नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यातील ११० नागरिकांचा मृत्यू झाला आहे