मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – या वर्षी १ जून ते २३ जुलै या पावसाळ्याच्या कालावधीत उद्भवलेल्या पूर, वादळ, भूस्खलन, वीज कोसळणे आदी नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यातील ११० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नागपूर येथे १५, तर नाशिक येथे १३ अशी या जिल्ह्यांची राज्यातील सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये २१८ पाळीव प्राण्यांच्याही मृत्यूची नोंद सरकारकडे नोंदवण्यात आली आहे.