सातारा येथे वाहतूक पोलिसांनी बुजवले वाढे फाटा येथील खड्डे !

शहराजवळ असणार्‍या वाढे फाटा येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी हे खड्डे बुजवले.

मानसिक आरोग्य महत्त्वाचे !

एका अभ्यासानुसार कोरोना महामारीनंतर नैराश्य आणि चिंताग्रस्त लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला लोक कसे सामोरे जात आहेत ? याचे सर्वेक्षण करण्यात आले.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे नाव पालटण्याचा प्रस्ताव असल्याने ‘एस्.टी.’च्या मार्गफलकांची नावेही पालटा ! – शिवसेनेचे सांगली उपशहर प्रमुख राम काळे यांचे निवेदन

राज्यशासनाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे नाव अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव पालटण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या मार्गफलकांची नावे मात्र जुनीच आहेत. तरी ‘एस्.टी.’च्या मार्गफलकांची नावेही पालटा…

सिंहगडावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण !

सिंहगडावर काही हॉटेल व्यावसायिकांनी गडावरील ऐतिहासिक स्मारकांच्या परिसरात, तसेच पदपथावर ‘टेबल’ आणि खुर्च्या मांडून व्यवसाय थाटला होता. गडावर सगळीकडे प्लास्टिकच्या बाटल्या, खाल्ल्यानंतर उरलेला अनेक प्रकारचा कचरा गोळा झाला होता.

शिरूर (पुणे) येथील निकृष्ट दर्जाचा डांबरी रस्ता हाताने उखडत असल्याने ग्रामस्थ संतप्त !

चाकण-शिक्रापूर रस्त्याला जोडणार्‍या जातेगाव (शिरूर) मधील रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा बनवण्यात आला आहे की, तो केवळ हाताने उखडला जात आहे. एक मासापूर्वी ६७ लाख रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या रस्त्याच्या दूरवस्थेवरून येथील ग्रामस्थ संतप्त झालेत.

कराड येथे २ धर्मांधांकडून नागरिकांना मारहाण करत दहशत माजवण्याचा प्रयत्न !

येथील बैल बाजारा रस्त्यावर मोरया वसाहत परिसरात २ धर्मांधांनी केशकर्तनालय (सलून) व्यावसायिकास विनाकारण मारहाण केली. परिसरात रस्त्यावरून शिवीगाळ करत इतर व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले.

अशा ख्रिस्ती शाळांवर बंदी घाला !

बरेली (उत्तरप्रदेश) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या ‘सेंट फ्रान्सिस स्कूल’ या शाळेमध्ये शीख विद्यार्थ्यांना शाळेत येतांना पगडी, कृपाण (लहान चाकू) आणि हातामध्ये कडे घालून येण्यावर बंदी घातली आहे.

रशिया-युक्रेन युद्ध संपता संपेना… !

आम्ही तुम्हाला पूर्णपणे नष्ट करू. त्याला प्रत्युत्तर देतांना युक्रेनच्या झेलेन्स्की यांनी सांगितले की, आता आमचे सैन्य अधिक आक्रमक झाले आहे आणि रशियाकडे गेलेला हा भाग आम्ही परत घेणार आहोत. तुर्कस्ताननेही धमकी दिली आहे. याविषयीचे विश्लेषण या लेखात पहाणार आहोत.

श्वसनसंस्थेच्या विकारांमध्ये उपयुक्त आयुर्वेदातील काही औषधे

सितोपलादी चूर्ण : आयुर्वेदामध्ये राजयक्ष्मासारख्या गंभीर रोगांमध्ये श्वसनसंस्थेतील दूषित कफ बाहेर काढणे, शरिरातील अग्नीचे दीपन करणे (पचनशक्ती सुधारणे) आणि सर्व शरिराला बळ देणे यांसाठी हे औषध वापरले जाते.