औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे नाव पालटण्याचा प्रस्ताव असल्याने ‘एस्.टी.’च्या मार्गफलकांची नावेही पालटा ! – शिवसेनेचे सांगली उपशहर प्रमुख राम काळे यांचे निवेदन

विभाग नियंत्रक भोकरे (मध्यभागी) यांना निवेदन देतांना राम काळे (डावीकडून दुसरे )

सांगली, २२ जुलै (वार्ता.) – राज्यशासनाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे नाव अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव पालटण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या मार्गफलकांची नावे मात्र जुनीच आहेत. तरी ‘एस्.टी.’च्या मार्गफलकांची नावेही पालटा, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे सांगली उपशहर प्रमुख राम काळे यांनी सांगली जिल्हा विभाग नियंत्रक भोकरे यांना दिले. या संदर्भात भोकरे यांनी योग्य ती कृती करण्याचे आश्वासन दिले. या वेळी सुमित पवार, सूरज पवार, राज बामणे यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.