रायगड जिल्ह्यात १३ जुलै या दिवशी विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला. तेथे मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
राष्ट्र घडण्यासाठी धर्माची नितांत आवश्यकता ! – ह.भ.प. सुरेश महाराज पाटील
पडघे – राष्ट्र घडण्यासाठी धर्माची नितांत आवश्यकता आहे. देव, देश आणि धर्म यांच्या आड कुणी येत असेल, तर त्याचा बीमोड करायला हवा. यासाठी प्रथम आपण धर्माचे पालन करायला हवे. सत्याची बाजू सोडू नये. सत्य नसेल, तर ज्ञान फलित होत नाही. इतर धर्मीय आपल्या धर्माचे पालन करतात; पण हिंदु करत नाहीत. हिंदु धर्मात मरण आले, तरी चालेल; पण दुसर्या धर्माचा स्वीकार करू नये, असे मार्गदर्शन ह.भ.प. सुरेश महाराज पाटील यांनी पडघे येथे केले.
देशात हिंदूंची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होणे आवश्यक ! – मोतीलाल जैन, अध्यक्ष, श्री श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघ
नवीन पनवेल – देशात हिंदूंची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होणे आवश्यक आहे. आज काही राज्यांत मुसलमानांची संख्या हिंदूंपेक्षा अधिक आहे. याचा गांभीर्याने विचार करायला हवा. ज्याप्रमाणे एक सैनिक १०० जणांना भारी पडतो, तसा एक धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदु अनेकांना भारी पडला पाहिजे. सनातन संस्थेने मंदिर सरकारीकरणाला विरोध केला. त्यामुळे काही प्रमाणात मंदिरांचे सरकारीकरण थांबले आहे. अद्याप तिरुपती, शिर्डी, पंढरपूर येथील मोठी मंदिरे सरकारच्या कह्यात आहेत. तेथील पैशाचा गैरवापर होत आहे. त्यामुळे मंदिरांचे सरकारीकरण थांबवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील.
मुलांवर उत्तम संस्कार करण्यासाठी सनातन संस्थेच्या उपक्रमांत सहभागी व्हा ! – संतोष वर्तक, संचालक, गौरव क्लासेस
कळंबोली – मुलांवर उत्तम संस्कार करण्यासाठी सनातन संस्थेच्या उपक्रमांत सहभागी व्हा ! धर्म आणि संस्कृती यांविषयी पालकांमध्ये जागृती नसल्यामुळे मुलांवर संस्कार होत नाहीत. यासाठी सनातन संस्थेच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग आणि साधना सत्संग घेतले जातात. त्यांचा लाभ घेणे आवश्यक आहे.
उपस्थित मान्यवर
पनवेल महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका सौ. सुशीला घरत, भाजपच्या नगरसेविका सौ. राजश्री वावेकर, देवद ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. संतोष वाघमारे, पनवेल शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे, शेकापच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सरस्वती कथारा, शेकापचे नगरसेवक विष्णु जोशी, गायत्री परिवाराचे सदस्य प्रद्युम्न शर्मा, सदस्या सौ. उषा शर्मा