येत्या विधीमंडळ अधिवेशनात दक्षिण मुंबईत वीर सावरकर यांच्या शौर्यगाथेचे संग्रहालय उभारण्याचा आग्रह धरणार ! – अधिवक्ता राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

अधिवक्ता नार्वेकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या वेळी ते म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या क्रांतीकारकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची देशातील नागरिकांना माहिती देणे, हे आपले कर्तव्य आहे.

हिंगोली येथील पूरग्रस्तांना अन्न न दिल्याने खासदारांनी तहसीलदारांना खडसावले !

जिल्ह्यातील वसमत तालुक्यात आलेल्या पुरामुळे लोकांना हालाखीचा सामना करावा लागत आहे. पुरामुळे अनेक घरातील अन्नधान्य वाहून गेले आहे, तसेच उपलब्ध असलेले अन्न शिजवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. प्रशासन साहाय्य पोचवेल, अशी गावकर्‍यांची अपेक्षा होती..

शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्यासह कोंढवा पोलिसातील ८ पोलिसांवर गुन्हा नोंद !

शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक नारायण लोणकर आणि कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्यासह ८ पोलीस कर्मचार्‍यांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

श्रीलंकेतील अराजक !

‘श्रीमंत आणि पुढारलेले म्हणवणारे पाश्चात्त्य देश कसे वागतात ?’ हे भारतानेही लक्षात ठेवून त्यांच्याकडे हात पसरणे बंद केले पाहिजे. भारतावरही एकूण कर्ज ४५१ अब्ज ९५ कोटी ५८ लाख रुपये एवढे आहे. याची नोंद घेऊन कर्ज फेडण्यासाठी वेगवान उपाययोजना काढण्यासह सर्वच गोष्टींत स्वयंपूर्ण होण्यावरही भर दिला पाहिजे, हे निश्चित !

भूस्खलनचा धोका असल्याने २५० नागरिकांचे स्थलांतर !

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मिरुखेवाडी येथील ८० कुटुंबातील २५० नागरिकांना भूस्खलनचा संभाव्य धोका असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून स्थलांतरित केले आहे.

सोलापूर येथील पाटस पथकर नाक्यावर वारकर्‍यांकडून पथकर वसुली : ४ जणांवर गुन्हा नोंद !

पथकर नाक्यांवर कर्मचारी, अधिकारी यांच्याकडून अरेरावी आणि बळजोरी केल्याच्या तक्रारी येतात. वारीच्या निमित्ताने पथकरात सवलत दिलेली असतांनाही बळजोरीने पथकर आकारणार्‍यांवर शासनाने कठोर कारवाई करावी, म्हणजे कुणी असे धाडस करणार नाही !

येरवडा कारागृहातून रजेवर गेलेला धर्मांध आरोपी पसार !

येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना कोरोना महामारीच्या काळात आपत्कालीन अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. याचाच लाभ घेत एका गुन्ह्यातील आरोपी महंमद सद्दाम शफीक शेख रजा संपल्यावर पुन्हा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी आला नाही.

मुसलमान स्मशानभूमीतील अवैध बांधकाम थांबवा ! – शिवबाराजे प्रतिष्ठान

येथील मौजे तुळजापूर घाटशीळ रस्ता येथील मुसलमान स्मशानभूमीमध्ये करण्यात येणारे अवैध बांधकाम थांबवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन ‘शिवबाराजे प्रतिष्ठान’च्या वतीने मुख्याधिकार्‍यांच्या नावे नगर परिषद येथे दिले.

हिंदू अल्पसंख्य झाल्यावर होणारा परिणाम जाणा !

जामताडा (झारखंड) जिल्ह्यातील १०० हून शाळांमध्ये रविवार ऐवजी शुक्रवारी सुटी देण्यात येत आहे. ज्या शाळांमध्ये ७० टक्के विद्यार्थी मुसलमान आहेत, तेथे शुक्रवारी सुटी देण्यात येत आहे.