शिराळा तालुक्यातील मिरुखेवाडी येथील घटना
शिराळा (जिल्हा सांगली), १० जुलै (वार्ता.) – सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मिरुखेवाडी येथील ८० कुटुंबातील २५० नागरिकांना भूस्खलनचा संभाव्य धोका असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून स्थलांतरित केले आहे. भाष्टेवस्ती, कोकणेवाडी, धामणकरवस्ती, मिरुखेवाडी, डफळेवाडी या ५ वाड्या-वस्त्यांवरील डोंगरांना भेगा पडल्या आहेत. घरात पाण्याचे उन्माळे लागले आहेत. त्यामुळे करुंगली येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात या सर्वांचे स्थलांतर करण्यात आले आहे. शेतीची कामे आणि जनावरांची देखभाल करण्यासाठी हे सर्व नागरिक सकाळी गावाकडे जाऊन सायंकाळी परत मुक्कामी येणार आहेत.