माऊलींच्या हिरा-मोती अश्वांचे आळंदीत देवस्थानच्या वतीने परंपरागत स्वागत !

माऊलींच्या पालखी सोहळ्यातील प्रथापरंपरांचे पालन करत श्रींचे मानाचे हिरा आणि मोती हे अश्व अंकली बेळगाव येथून अलंकापुरीत हरिनाम गजरात आले आहेत.

राजगडावरील दरवाजा दीड मासात निखळला !

पुरातत्व विभाग सक्षमपणे कार्यरत नसल्याचे उदाहरण ! गडांचे जतन आणि संवर्धन करणे, हे पुरातत्व विभागाचे कार्य असतांना ‘प्रत्येक मासाला लक्षावधी रुपयांचे वेतन घेणारे पुरातत्व विभागाचे अधिकारी नेमके काय करतात ?’, असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

आषाढीपूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांसह अन्य मठांचे ‘फायर ऑडिट’ !

आषाढी यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महापालिकेचे अग्नीशमन विभागाचे केदार आवटे यांची ‘इन्सिडंट कंमाडर’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

इंद्रायणीचे पाणी दूषित झाल्याने वारकऱ्यांनी ते न वापरण्याचा आळंदी नगरपरिषदेचा आदेश !

प्रशासनाने आषाढी एकादशीपूर्वी चंद्रभागा नदीची तातडीने स्वच्छता का केली नाही ? हे समजले पाहिजे. यामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !

पुणे पोलिसांकडून पालखी सोहळ्यासाठी व्यापक नियोजन

कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यांसाठी ४ सहस्र पोलिसांसमवेत राज्य राखीव पोलीस, विशेष शाखा, गुन्हे शाखेतील पोलीस यांचा समावेश आहे.

सोलापूर येथे ‘पीओपी’च्या ४ लाख श्री गणेशमूर्तींच्या विक्रीचा पेच !

मूर्तीकारांना चिकणमाती अथवा अन्य पर्याय उपलब्ध करून दिले नाहीत. आता सिद्ध झालेल्या मूर्तींविषयी मूर्तीकारांचे शंकानिरसन प्रशासन करणार का ? यातून प्रशासनाचा ढिसाळ कारभार दिसून येतो.

राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून बैठकीचे आयोजन !

अग्नीपथ योजनेमुळे हिंसक आंदोलन चालू असल्याचे प्रकरण, केंद्रशासनाने घोषित केलेल्या अग्नीपथ योजनेमुळे अनेक राज्यांमध्ये हिंसक आंदोलन चालू आहे.

नागपूर येथे अल्पवयीन मुलीवर धर्मांधाकडून बलात्कार !

सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा तालीब कमाल उपाख्य बैहरा खालीद अंसारी (वय ५३ वर्षे) याला पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पू. भिडेगुरुजी यांना पोलीस अनुमतीविना पालखी सोहळ्यात प्रवेश नाही ! – पुणे पोलीस आयुक्त

दोन्ही पालख्यांचे प्रस्थान झाल्यावर एकाच दिवशी त्या ‘संचेती हॉस्पिटल’ जवळून पुण्यात प्रवेश करतात. त्या वेळी रुग्णालयाजवळ पू. संभाजी भिडेगुरुजी धारकऱ्यांसहित पालखी सोहळ्यात सहभागी होतात…