राजगडावरील दरवाजा दीड मासात निखळला !

राजगडावरील दरवाजा दीड मासात निखळला

वेल्हे (पुणे) – राजगडावर जाणाऱ्या मुख्य मार्गावरील पाली दरवाज्यावर नुकतेच बसवलेले लाकडी दार १९ जून या दिवशी निखळल्याची माहिती गडाचे पुरातत्व विभागाचे कर्मचारी पहारेदार बापू साबळे यांनी दिली. राजगडावर ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या वतीने १ मे या दिवशी वेगवेगळ्या ७ ठिकाणी लाकडी दरवाजे बसवण्यास पुरातत्व विभागाने अनुमती दिली होती.

( सौजन्य: झी २४ तास )

गडावरील अवशेषांचे मजबुतीकरण करण्याविषयीचा कोणताही अहवाल पुरातत्व विभागाने प्रसिद्ध केलेला नाही, तसेच गडावर बसवण्यात आलेले दरवाजे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून बसवण्यात आले नसल्याचे समजते. (पुरातत्व विभागाने याचे दायित्व घेऊन अन्य संघटनांनी बसवलेल्या दरवाजांचे जतन व्यवस्थित कसे होईल, ते पहायला हवे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

पुरातत्व विभाग सक्षमपणे कार्यरत नसल्याचे उदाहरण ! गडांचे जतन आणि संवर्धन करणे, हे पुरातत्व विभागाचे कार्य असतांना ‘प्रत्येक मासाला लक्षावधी रुपयांचे वेतन घेणारे पुरातत्व विभागाचे अधिकारी नेमके काय करतात ?’, असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?