‘सनातन संस्थे’च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या प्रसारासाठी फलक तसेच निमंत्रण पत्रिका उपलब्ध !

साधकांना सूचना

सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवांच्या प्रसारासाठी आवश्यक असलेले प्रसाराच्या साहित्याची कलाकृती (आर्टवर्क) नेहमीच्या संगणकीय ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. या कलाकृतींवर स्थानिक महोत्सवाचे स्थळ, दिनांक आणि वेळ घालून, तसेच त्यासाठी प्रायोजक मिळवून  ते मंदिरे, रहिवासी संकुले, शाळा-महाविद्यालये, वाचनालये, हिंदुत्वनिष्ठ संघटनांची कार्यालये आदी सुयोग्य सार्वजनिक ठिकाणी लावावेत. उपलब्ध प्रसारसाहित्य पुढीलप्रमाणे आहे.

१. ‘ए ५’ आकारातील ४ पानी निमंत्रण पत्रिका

२. ‘६ फूट Ñ ४ फूट’, ‘८ फूट Ñ ६ फूट’, ‘१० फूट Ñ ८ फूट’ आणि ‘१२ फूट Ñ १० फूट’ या आकारांतील फ्लेक्स फलक

वरील प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा सुयोग्य वापर करावा.