१. सत्सेवेच्या तळमळीमुळे वाराणसी सेवाकेंद्रात सेवेसाठी येणे
सुश्री (कु.) सुनीता छत्तर या मूळच्या ओडिशा येथील आहेत. त्यांचे कुटुंब वडिलांच्या नोकरीनिमित्त दीर्घकाळपासून जमशेदपूर, झारखंड येथे रहात होते. त्या झारखंड येथे सनातन संस्थेच्या संपर्कात आल्या आणि नंतर त्या सत्सेवेच्या तळमळीमुळे वाराणसी सेवाकेंद्रात आल्या.
२. परेच्छेने वागणे
अ. सुश्री (कु.) सुनीता छत्तर साधारण २ वर्षे सेवाकेंद्रात राहिल्यावर कुटुंबियांच्या इच्छेसाठी स्वतःची इच्छा नसतांनाही त्या जड अंतःकरणाने पुन्हा घरी गेल्या.
आ. कुटुंबियांनी त्यांचा विवाह करण्याचे प्रयत्न चालू केले होते, तेही त्यांनी परेच्छेने स्वीकारले.
३. घरी व्यष्टी साधना चालू ठेवणे आणि नियमितपणे सेवाकेंद्रातील साधकांच्या संपर्कात रहाणे
घरी गेल्यावर त्यांनी व्यष्टी साधना चालू ठेवली. या कालावधीत त्या नियमितपणे सेवाकेंद्रातील साधकांच्या संपर्कात राहिल्या. त्यांची सेवाकेंद्रात येण्याची तळमळ जागृत होती.
४. एक वर्षानंतर सेवाकेंद्रात रहायला येणे आणि सेवाकेंद्रात यायला मिळाले, याविषयी कृतज्ञता वाटणे
एक वर्षाहून अधिक कालावधी घरी राहिल्यावर कुटुंबातील वडीलधार्यांच्या अनुमतीने त्या पुन्हा वाराणसी सेवाकेंद्रात आल्या. त्यानंतर त्यांच्या मनात ‘गुरुकृपेने मला पुन्हा सेवाकेंद्रात यायला मिळाले’, याविषयी कृतज्ञतेचा भाव वाढला.
५. तळमळीने आणि दायित्व घेऊन सेवा करणे
तीव्र शारीरिक त्रास असतांनाही त्यावर मात करून त्या सेवाकेंद्रातील विविध सेवा तळमळीने आणि दायित्व घेऊन करतात.
६. त्या व्यष्टी साधना नियमित करतात आणि व्यष्टी साधनेचा आढावाही नियमित देतात.
७. साधनेमुळे झालेले पालट पाहून आई-वडिलांनी सुश्री (कु.) सुनीता यांना घरी घेऊन जाण्याचा निर्णय पालटणे
काही दिवसांपूर्वी त्यांचे आई-वडील पुन्हा एकदा त्यांना घरी नेण्यासाठी आले होते. त्या वेळी सुश्री (कु.) सुनीता यांनी त्यांना ‘मी इथे आनंदात आहे, तरी तुमची इच्छा असेल, तर मी घरी येईन’, असे नम्रतेने सांगितले. सुश्री (कु.) सुनीता यांच्यामध्ये साधनेमुळे झालेले पालट आणि त्या आनंदी असल्याचे पाहून आई-वडिलांनी त्यांना घरी घेऊन जाण्याचा निर्णय पालटला. सुश्री (कु.) सुनीता यांच्यासाठी ही एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती होती.
८. ‘सेवाकेंद्रात राहून गुरुचरणांची प्राप्ती करणे’, हा ध्यास असणे
मागील अनेक वर्षे त्या सेवाकेंद्रात महाप्रसाद बनवण्याशी संबंधित सेवा दायित्व घेऊन करत आहेत. त्या भक्तीसत्संगातून नियमितपणे शिकून भावजागृतीसाठी प्रयत्न करतात, तसेच भक्तीसत्संगात नियमितपणे सहभागी होतात. त्यांच्या मनात घरी जायचा विचारही येत नाही. ‘सेवाकेंद्रात राहून गुरुचरणांची प्राप्ती करणे’, हा ध्यास ठेवून त्या प्रयत्न करतात. (७.१.२०२२)
(सुश्री (कु.) सुनीता छत्तर यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |