रशियाशी चर्चेला सिद्ध; परंतु बेलारूस येथे नाही ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

रशियाने युक्रेनला बेलारूसमध्ये चर्चेसाठी आमंत्रित केले होते; मात्र युक्रेनने रशियाची अट नाकारत चर्चा करण्यास नकार दिला आहे. झेलेंस्की यांनी सांगितले की, आम्ही वॉर्सा, ब्रातिस्लाव्हा, बुडापोस्ट, इस्तंबूल आणि बाकू यांपैकी कोणत्याही ठिकाणी चर्चेस सिद्ध आहोत.

युक्रेन-पोलंड सीमेवर सुरक्षारक्षकांकडून भारतीय विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

युक्रेन-पोलंड सीमेवर युक्रेनच्या सुरक्षारक्षकांनी केवळ युक्रेनच्या नागरिकांना पोलंडमध्ये जाण्याची अनुमती दिली, तर भारतियांना बाजूला काढून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

युक्रेनवासियांना ‘इस्कॉन’चे साहाय्य !

‘देशातील गरजू नागरिकांना साहाय्य करण्यासाठी युक्रेनमधील सर्व ५४ मंदिरे खुली करण्यात आली आहेत. संकटात असलेल्या नागरिकांना साहाय्य करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत’, अशी माहिती ‘इस्कॉन’चे कोलकाता येथील उपाध्यक्ष राधारमण दास यांनी दिली.

अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह भाष्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात गुन्हा नोंद !

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मालिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने २५ फेब्रुवारी या दिवशी निदर्शने केली. या वेळी गावडे यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

‘फोन टॅपिंग’ प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुणे येथे गुन्हा नोंद !

रश्मी शुक्ला यांनी वर्ष २०१५ ते २०१९ या कालावधीमध्ये राजकीय नेत्यांचे ‘फोन टॅपिंग’ करून त्यातील संभाषण भाजप-सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरवल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

राजकीय स्वार्थासाठी मुलीची नाहक अपकीर्ती केली जात असल्याचे दिशा हिच्या पालकांनी तक्रारीत म्हटले असून राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

धर्मांधांकडून कधी अशी कृती होते का ?

युक्रेनमध्ये युद्ध भडकल्यानंतर तेथील नागरिकांच्या साहाय्यासाठी ‘इस्कॉन’ या आध्यात्मिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासाठी युक्रेनमधील सर्व ५४ मंदिरे खुली करण्यात आली आहेत.

अखिल मानवजातीला मार्गदर्शक आणि अध्यात्मातील जिज्ञासूंमध्ये लोकप्रिय होत असलेले सनातन संस्थेचे ‘sanatan.org’ संकेतस्थळ !

महाशिवरात्र (१.३.२०२२) या दिवशी असलेल्या सनातन संस्थेच्या (नवीन स्वरूपातील) संकेतस्थळाच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त…