अखिल मानवजातीला मार्गदर्शक आणि अध्यात्मातील जिज्ञासूंमध्ये लोकप्रिय होत असलेले सनातन संस्थेचे ‘sanatan.org’ संकेतस्थळ !

महाशिवरात्र (१.३.२०२२) या दिवशी असलेल्या सनातन संस्थेच्या (नवीन स्वरूपातील) संकेतस्थळाच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त…

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने वर्ष २०१२ मध्ये महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या शुभ हस्ते नव्या स्वरूपातील ‘Sanatan.org’ या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. 

‘शास्त्रीय परिभाषेत अध्यात्म, धर्मशिक्षणाचा प्रसार आणि हिंदुहितासाठी कार्य’, या व्यापक उद्देशांनी कार्यरत असलेल्या सनातनच्या नव्या स्वरूपातील या संकेतस्थळाची लोकप्रियता वाढत आहे. संकेतस्थळाचे वैशिष्ट्य, म्हणजे त्यावरील अध्यात्मशास्त्रीय ज्ञानात धर्मशास्त्रीय ज्ञान आणि पृथ्वीवर उपलब्ध नसलेले ईश्वरीय ज्ञान या दोहोंचा समावेश आहे. त्यामुळे हे संकेतस्थळ अध्यात्मशास्त्रातील जिज्ञासूंपासून धर्मप्रचारकांपर्यंत आणि हिंदु समाजापासून अखिल मानवजातीपर्यंत सर्वांनाच मार्गदर्शक ठरत आहे.

१.३.२०२२ या दिवशी, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी सनातन संस्थेच्या संकेतस्थळाचा १० वा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने संकेतस्थळाच्या माध्यमातून झालेल्या कार्याचा आढावा पुढे दिला आहे.

१. संकेतस्थळाच्या वाचकसंख्येत सातत्याने वृद्धी होत असणे

संकेतस्थळाला भेट देणार्‍या वाचकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संकेतस्थळाला जगभरातील १८० हून अधिक देशांतील जिज्ञासू भेट देतात. वर्ष २०२१ मध्ये सरासरी १ लाख ६५ सहस्रांहून अधिक वाचकांनी प्रतिमास ‘Sanatan.org’ या संकेतस्थळाला भेट दिली. सध्या हे संकेतस्थळ मराठी, कन्नड, इंग्रजी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगू, मल्याळम् आणि नेपाळी, या ९ भाषांमध्ये कार्यरत आहे.

२. अध्यात्मशास्त्रावरील शेकडो शंकांचे निरसन तत्परतेने करण्यात येणे

आतापर्यंत संकेतस्थळावर अध्यात्मातील विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. ‘कर्मकांड, विविध व्रते, देवघर, पूजाविधी, प्रदक्षिणा, वास्तूशुद्धी, अग्निहोत्र, सूर्योपासना, पूर्वजांचा त्रास, श्राद्ध, अंत्यविधी, सुतक, वाईट शक्ती, ‘सुख आणि शांती मिळवण्यासाठी काय करावे ?’, तसेच कुलदेवता, नामजपातील अडथळे, आध्यात्मिक पातळी, गुरु करणे, गुरुबंधू’ आदी अध्यात्मातील अनेक अंगांविषयी जिज्ञासूंनी प्रश्न विचारले असून प्रत्येकाला त्यांची उत्तरे पाठवण्यात आली आहेत. जिज्ञासूंनी विचारलेल्या प्रश्नांना ४८ घंट्यांत उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे. मागील वर्षभरात साधारण ३०० जिज्ञासूंनी स्वत:च्या शंकांचे निरसन करवून घेतले.

३. संकेतस्थळावरील विविध विषयांवर लेख उपलब्ध असणे 

संकेतस्थळावर ‘धर्म, धर्मग्रंथ, अध्यात्म, सोळा संस्कार, धार्मिक कृती, सण, उत्सव आणि व्रते, हिंदु देवता, तसेच ‘अध्यात्मातील अपसमज आणि त्यांचे खंडण’, ‘पाश्चात्त्य (कु)संस्कृतीचे अंधानुकरण कसे टाळावे ?’, ‘भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाऊलखुणा’, ‘आयुर्वेद’, तसेच ‘घरच्या घरी लागवड मोहीम’ आदी विषयांवरील लेख उपलब्ध आहेत.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्पर्धा, यश-अपयश, तसेच महामारीसारख्या विविध समस्या यांना सामोरे जाण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ लागते. यासाठीच संस्थेने ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गांतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून यशस्वी अन् आनंदी जीवन कसे जगावे ?’, याचा वस्तूपाठच लोकांना उपलब्ध करून दिला आहे. वाचक संकेतस्थळावरील माहिती वाचून कृती करण्यास उद्युक्त होतात आणि त्यानुसार आचरण करून त्यांना लाभ होत असल्याचे अभिप्रायांद्वारे आवर्जून कळवतात.

४. ‘सनातन पंचांग ॲप’, तसेच सनातनच्या विविध ‘ॲप’द्वारे पाठवण्यात येणार्‍या ‘नोटिफिकेशन’ला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन पंचांगाच्या, तसेच सनातनच्या विविध ‘ॲन्ड्रॉईड’ आणि ‘आयओएस्’ या ‘ॲप’द्वारे पाठवण्यात येणार्‍या मराठी, कन्नड, गुजराती, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम् आणि इंग्रजी या भाषांतील ‘नोटिफिकेशन’मुळे लाखो वाचकांनी संकेतस्थळाला भेट दिली.

(क्रमश:) 

– संकेतस्थळाशी संबंधित सेवा करणारे साधक (१९.२.२०२२)

या संकेतस्थळावरील ‘ऑनलाईन धर्मदान (डोनेशन)’ देण्याच्या सुविधेमुळे अनेक वाचकांनी या अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभाग घेतला. आपणही या सुविधेद्वारे धर्मदान देऊन धर्मपुण्य वाढवू शकता.

धर्मदान देण्यासाठी भेट द्या
https://www.sanatan.org/en/donate

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/557299.html