नवी मुंबई – वाशी येथे एका आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह भाष्य केल्यामुळे नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अशोक गावडे यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. अल्पसंख्यांकमंत्री नवाब मालिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने २५ फेब्रुवारी या दिवशी निदर्शने केली. या वेळी गावडे यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात कलम ५०९ नुसार (महिलेस लज्जा वाटावी, तिला अपमानित करणे) गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
या प्रकरणी नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभेचे आमदार अनुक्रमे मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांनी अशोक गावडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त कार्यालयात तक्रार नोंदवली.