पुणे येथील १४ जणांच्या टोळीने धारदार शस्त्रांसह रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली !

सामान्य जनतेला दहशतीच्या सावटाखाली जगावे लागणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पद आहे. निष्पाप जनतेला नव्हे, तर गुन्हेगारांना दहशत वाटेल अशी जरब पोलीस कधी निर्माण करणार ?

आर्थिक लाभासाठी सौरऊर्जा निर्मितीसाठी असलेल्या ‘प्रधानमंत्री कुसुम योजने’त सहभागी होण्याचे शेतकर्‍यांना आवाहन

या योजनेद्वारे सौरऊर्जा प्रकल्पामध्ये निर्माण होणारी वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण आस्थापनाला विकून अथवा सौर प्रकल्पासाठी भूमी भाडेपट्टीवर देऊन उत्पन्न मिळवण्याची संधी शेतकर्‍यांना मिळणार आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना मुरगुड (जिल्हा कोल्हापूर) शहरात बंदीचा नगरपरिषदेचा ठराव !

शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना मुरगुड शहरात कायमची बंदी घालण्याचा ठराव नगरपरिषदेने केला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष राजू खान जमादार यांनी दिली.

महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात ‘ॲट्रॉसिटी’ कायद्याच्या धर्तीवर कायदा सिद्ध करा ! – सौ. चित्रा वाघ, भाजप

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (ॲट्रॉसिटी कायदा) धर्तीवर कायदा सिद्ध करा, अशी मागणी भाजपच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी केली.

उपमुख्यमंत्री आजगांवकर आणि सार्वजनिक बांधकाममंत्री पाऊसकर यांना उच्च न्यायालयाकडून नोटीस

मगो पक्षाने उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या अपात्रता याचिकेच्या प्रकरणी उच्च न्यायालयाने आज मगो पक्षाचे माजी आमदार आणि भाजपचे विद्यमान आमदार बाबू आजगांवकर आणि दीपक पाऊसकर यांना नोटीस पाठवली.

महिलेकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धैर्य होऊ नये, अशी कठोर शिक्षा आरोपींना व्हायला हवी ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, भाजप

आपल्या राज्यात, देशात आणि संस्कृतीत महिलांना पूजनीय स्थान देण्यात आले आहे. महिला अत्याचारातील घटनांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढायला हवे. ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यास आरोपीला देहदंडाची शिक्षा करावी’, अशी मागणी आम्ही लावून धरली; पण आजचे चित्र विदारक आहे..

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या १५ सदस्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नोटीस !

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या १५ सदस्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस पाठवली असून २९ सप्टेंबरपर्यंत कार्यालयात उपस्थित रहाण्यास सांगितले आहे, अशी माहिती अन्वेषण अधिकारी पोलीस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे यांनी दिली.

हिंदु राष्ट्र सेना हिंदु युवकांना आपत्कालीन प्रशिक्षण देण्यास कटीबद्ध ! – मोहन तिवारी, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, हिंदूराष्ट्र सेना

येणारा काळ हा आपत्काळ आहे. त्यासाठी हिंदु राष्ट्र सेना हिंदु युवकांना आपत्कालीन प्रशिक्षण देण्यास कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री. मोहन तिवारी यांनी केले.

गोव्यात संचारबंदीच्या संदर्भातील चित्र अस्पष्ट : धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन संभ्रमात !

गोव्याच्या जिल्हा प्रशासनाचा कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांविषयीचा आदेश २० सप्टेंबर २०२१ या दिवशी संपुष्टात आला आहे. जिल्हा प्रशासनाने या आदेशाचे नूतनीकरण न केल्याने भारतीय दंड संहितेचे १४४ कलम गैरलागू ठरले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळालेली मान्यता रहित

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने अतिशय महत्त्व असलेल्या या महाविद्यालयाची मान्यता रहित झाल्याने सर्वसामान्य जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे, तर जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी राजकीय पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.