तुर्भे येथे आज माथाडी कामगारांचा ‘ऑनलाईन’ मेळावा !

महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबर या दिवशी तुर्भे येथील माथाडी भवनमध्ये माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे…

४ ऑक्टोबरपासून शाळा चालू करण्यास मुख्यमंत्र्यांची अनुमती

कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा ४ ऑक्टोबरपासून चालू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुमती दिली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून शाळा चालू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे अनुमती मागण्यात आली होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी आता मान्य केली आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अपव्यवहारामुळे सखोल चौकशी करणार !

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (मुंबै बँकेच्या) व्यवहारात गेल्या पाच वर्षांत अनियमितता झाल्याने या अधिकोषाच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे या अधिकोषाचे अध्यक्ष आहेत…

किल्ले अजिंक्यतारा येथे ‘रोप वे’साठी प्रयत्न करणार ! – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार, भाजप

सातारा जिल्ह्यात अनेक गडकोट आहेत. नागरिकांनी येथे येऊन आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे. किल्ले अजिंक्यतारा हे सातारा शहराचे सौंदर्य आहे. त्यामुळे येथे पर्यटनवृद्धीसाठी ‘रोप वे’ झालाच पाहिजे. सातारावासियांनाही ‘रोप वे’मध्ये बसायला मिळाले पाहिजे…

पुण्यात हिंदु देवतांचा अवमान करणारा ‘अर्धनारी नटेश्वर’ नावाने तृतीयपंथियांचा ‘फॅशन शो’ !

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन होणे, हे लज्जास्पद आहे. हिंदूंनो अशा कार्यक्रमांना संघटितपणे वैध मार्गाने विरोध होणे अपेक्षित होते !

कल्याण येथे ८ वर्षांच्या मुलीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार !

कठोर शिक्षा होत नसल्यानेच गुन्हेगार गुन्हे करण्यास वारंवार धजावतात !

शेतकर्‍याकडून ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोषाच्या अधिकार्‍यासह दोघे अटकेत !

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोषाचे (पीडीसीसी) विकास अधिकारी दीपक सायकर आणि वाडेबोल्हाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव गोपीचंद इंगळे यांना २२ सप्टेंबर या दिवशी लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

महाबळेश्वर (जिल्हा सातारा) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

बलात्कार करणार्‍यांना फाशीसारखे कठोर शासन केले, तरच अशा घटना थांबतील !

१० सहस्र रुपयांची लाच घेतांना पुणे येथील २ पोलीस ‘एसीबी’च्या कह्यात !

लाचखोर आणि भ्रष्ट पोलिसांमुळेच भ्रष्टाचार संपत नाही, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? त्यासाठी पोलिसांची नियुक्ती करतांनाच नीतीवान, कर्तव्यदक्ष आणि राष्ट्रप्रेमी तरुणांना प्राधान्य द्यायला हवे !

मतदारसूचीतील अनुमाने ३ लाख मतदारांचे छायाचित्र उपलब्ध नाही

पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसूची अद्ययावत करतांना उघड झालेली माहिती !