मुरुगुड (जिल्हा कोल्हापूर), २४ सप्टेंबर – शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना मुरगुड शहरात कायमची बंदी घालण्याचा ठराव नगरपरिषदेने केला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष राजू खान जमादार यांनी दिली. मुरगुड नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे पार पडली. त्यात हा ठराव करण्यात आला. (स्वतंत्र भारतात या देशातील कोणताही नागरिक कुठेही मुक्त संचार करू शकतो. असे स्वातंत्र्य त्याला घटनेने दिले आहे. असे असतांना एखादी नगरपरिषद माजी खासदारास शहरात न येण्याविषयी ठराव कसा करू शकते ? अशा कायदाबाह्य घटनेची संबंधित प्रशासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी, ही अपेक्षा ! – संपादक)