कणकवली – तालुक्यातील नरडवे आणि देवधर पाटबंधारे प्रकल्पासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्पांविषयी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांनी चर्चा केली. या वेळी ‘येत्या काळात निश्चितपणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या समस्या मार्गी लावू, तसेच जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लवकरच जिल्ह्यात येऊ’, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री पाटील यांनी दिली. (जलसंपदा मंत्री जिल्ह्यात येऊन पाटबंधारे प्रकल्पांच्या समस्या जाणून घेणार हे चांगलेच आहे; मात्र सर्व प्रशासकीय यंत्रणा हाताशी असतांना मंत्र्यांना समस्या जाणून घेण्यासाठी जिल्ह्यात यावे लागत असेल, तर या यंत्रणांचा उपयोग काय ? असा प्रश्न पडल्यास चुकीचे ठरेल का ? – संपादक)