संभाजीनगर – शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, वाहतूक कोंडी, मोर्चा, दंगल किंवा इतर कोठल्याही आणीबाणीच्या परिस्थितीत पोलीसयंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोचावी, यांसाठी शहरातील ४१८ ठिकाणी ७०० ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवण्यात आले आहेत. त्यासाठी ‘स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’च्या निधीतून १७६ कोटी रुपये व्यय करण्यात आले आहेत. या ‘कॅमेर्या’चे चित्रण (फूटेज) पहाण्यासाठी पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र ‘कमांड कंट्रोल सेंटर’ उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलीस ठाण्यातही ‘कॅमेर्या’चे चित्रण त्यांना पहाता येणार आहे, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.